Type Here to Get Search Results !

प्रकाश अहिरे यांची बसपाच्या उत्तर अहमदनगर महासचिव पदी निवड...

 प्रकाश अहिरे यांची बसपाच्या उत्तर अहमदनगर महासचिव पदी निवड...



श्रीरामपूर/ प्रतिनिधी

        थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिराव फुले, राजश्री शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे, यांच्या चळवळीमध्ये असलेले योगदान तसेच बहुजन नायक कांशीरामजी यांच्या विचारधारेवर असलेली निष्ठा तसेच बसपा राष्ट्रीय अध्यक्षा कु. मायावतीजी यांच्या नेतृत्वावर असलेला दृढ विश्वास पाहता तसेच नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये अहमदनगर जिल्ह्याची महत्वाची जबाबदारी सांभाळणारे श्रीरामपूर येथील प्रकाश अहिरे यांचे योगदान लक्षात घेता पक्षाच्यावतीने त्यांची अहमदनगर उत्तर जिल्हा महासचिव पदी निवड करून त्यांना गौरविण्यात आले. 

     (दि.०७ ऑक्टोंबर २०२४) अहमदनगर येथील शासकीय विश्रामगृहावर बहुजन समाज पार्टीच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे महासचिव हुलगेश चलवादी यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच महाराष्ट्र राज्याचे कार्यकारी सदस्य व अहमदनगर जिल्हा प्रभारी रामचंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक पार पडली. सदर बैठकीमध्ये अहिरे यांची निवड करण्यात आली.

         सदरील बैठकीमध्ये जिल्ह्यातील विविध पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. यावेळी मान्यवरांनी निवड झालेल्यांना शुभेच्छा देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. व येणाऱ्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी जोमाने तयारीला लागण्याची आदेश दिले.

Post a Comment

0 Comments