नाशिक जिल्ह्यात पावसाची जोरधार सुरूच...
गोदावरी, दारणा, कादवा नद्या दुथडी भरून वाहू लागल्या..
सलग दुसऱ्या दिवशी नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात संततधार सुरु असल्याने शनिवारी गंगापूर, दारणासह एकूण १० धरणांमधून विसर्ग करावा लागला.
नाशिक प्रतिनिधी/- वेदांगी प्रभुणे
नाशिक : सलग दुसऱ्या दिवशी जिल्ह्यातील अनेक भागात संततधार सुरु असल्याने शनिवारी गंगापूर, दारणासह एकूण १० धरणांमधून विसर्ग करावा लागला. गंगापूर धरणातील विसर्ग आणि शहरात सुरू असणाऱ्या पावसाने गोदावरी नदीची पातळी पुन्हा उंचावत आहे. गोदावरीच्या पुराचा निदर्शक मानल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या कंबरेपर्यंत पाणी आले आहे. सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि पेठ या घाटमाथ्याच्या भागात पावसाचा जोर अधिक आहे. इगतपुरी शहरात काही घरांमध्ये पाणी शिरल्याने रहिवाश्यांना सुरक्षितस्थळी हलवावे लागले.
SJ लाईटस(श्रीरामपुर)
लवकरच ऑर्डर बुकिंग करा पुढील उत्सवासाठी
गणपती दहीहंडी नवरात्र इतर उत्सवासाठी ऑर्डर स्वीकारल्या जातील.
संपर्क/-अविनाश बनसोडे,मो. 98603 59213,8698310444


Post a Comment
0 Comments