वाकला मुक्कामी बस अज्ञात व्यक्तीकडून पेटवण्याचा प्रयत्न...
वैजापूर प्रतिनिधी/ अरविंद पवार
अज्ञाताने बसचा पाठीमागील टायर जाळण्याचा प्रयत्न केल्याने झालेले नुकसान.
वैजापूर:- वैजापूर तालुक्यातील वाकला येथे मुक्कामी येणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाची वैजापूरआगाराची बस क्र. (एम.एच.२० बीआई ३०३७) वाकला ता वैजापूर या ठिकाणी मुक्कामी असतांना दि.३१ शनिवार रोजी पहाटे साडे तीन वाजेच्या सुमारास अज्ञात इसमाने बस पेटवण्याचा प्रयत्न केला.
चालक, वाहक यांनी तात्काळ प्रसंगावधान राखून अग्निशामक उपकरण वापरून आग विझवण्यास प्रयत्न केला.यात बाहेरील बाजूचा टायर जळाला आहे. अधिक्षक गोपाल पगारे, ए.एस. पोटे (स.का.मा.) यांनी सदरल बसची पाहणी केली.यावेळी शिऊर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव रणखांबे यांनी पंचनामा केला. बस चालक एस. एस. खांडगौरे, वाहक एस. आर. सोनवणे, बी. जी. जाधव, एस. एस. दवंगे, तातेराव हिरे, हॉटेसिंग सिंग चौधरी, प्रशांत निकम, या ठिकाणी उपस्थित होते.
दरम्यान वैजापूर तालुक्याती वाकला गावात येणारी बस कोणीतरी जाळण्याचा प्रयत्न केल्याने एसटीची मोठी हानी टळली. असा खोळसाळ पणामुळे गावात येणारी बस बंद होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Post a Comment
0 Comments