Type Here to Get Search Results !

कोल्ही शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन...

 कोल्ही शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन...

अध्यक्ष चंद्रकांत पवार तर उपाध्यक्ष जीवन गोरे यांची निवड.

वैजापूर प्रतिनिधी/ अरविंद पवार

       जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोल्ही.केंद्र बोरसर.ता.वैजापूर.जि. छत्रपती संभाजीनगर या शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन करण्यात आले. 

       सर्व वर्गातील पालकांमधून प्रवर्ग निहाय सदस्य निवडण्यात आले. निवडून आलेल्या सदस्यांमधून अध्यक्ष म्हणून श्री.चंद्रकांत पंढरीनाथ पवार,उपाध्यक्ष म्हणून श्री.जीवन जालिंदर गोरे तर सदस्य म्हणून श्री.मच्छिंद्र विश्वनाथ म्हस्के,श्री.अरुण साहेबराव गोंधळे, श्रीमती.मुक्ता देविदास डघळे, श्री. दादासाहेब गणेश पवार ,श्रीमती.अनिता मच्छिंद्र पवार,श्रीमती.जनाबाई पुंडलिक दाणे श्रीमती.कल्पना देविदास कदम व श्रीम.मोनिका कृष्णा म्हस्के यांची निवड पालक सभेतून करण्यात आली. शाळेच्या वतीने अध्यक्ष,उपाध्यक्ष व सर्व सदस्यांचे अभिनंदन व स्वागत करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती.उज्वला मिसाळ मॅडम यांनी सर्व पालक व सदस्यांचे आभार मानले.



Post a Comment

0 Comments