श्रीरामपूर मध्ये ईद-ए-मिलादुन्नबीच्या (पैगंबर जयंती) निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
प्रतिनिधी /श्रीरामपूर
ईद-ए-मिलादुन्नबीच्या (पैगंबर जयंती) निमित्ताने कर्मवीर चौक मित्र मंडळ आणि अलवारीस यूथ फाऊंडेशनच्या वतीने तीन विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, जे यशस्वीरीत्या पार पडले. या कार्यक्रमांमध्ये रक्तदान शिबिर, जेवणाचा कार्यक्रम आणि श्री सिद्धिविनायक अंधशाळेसाठी संगणक भेट यांचा समावेश होता.
◆पहिल्या कार्यक्रमात:- रक्तदान शिबिरात १०० पेक्षा जास्त लोकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. डॉ. जोंधळे यांनी या वेळी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “श्रीरामपूरमध्ये प्रथमच इतका मोठा प्रतिसाद रक्तदानासाठी पाहायला मिळाला आहे.” या उपक्रमामुळे समाजातील रक्तदानाच्या गरजेविषयीची जागरूकता वाढली आहे.
◆दुसऱ्या कार्यक्रमात:- जेवण्याच्या कार्यक्रमात १००० पेक्षा अधिक लोकांनी सहभागी होऊन जेवणाचा लाभ घेतला. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सुनिल दहाळे, अॅड. एजाज पठाण, शाकिब शेख, आणि समीऱ शेख यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले आणि उपस्थितांचा आभार मानले.
◆तिसऱ्या कार्यक्रमात:- श्री सिद्धिविनायक अंधशाळेला संगणक भेट देण्यात आले. या प्रसंगी, श्री सिद्धिविनायक अंधशाळेचे विश्वस्त अॅड. चुडिवाल यांनी आपल्या ८१ वर्षांच्या अनुभवातून सांगितले की, “माझ्या ४० वर्षांच्या सेवाकाळात प्रथमच मला वाटले की माझा आवाज श्रीरामपूरच्या लोकांपर्यंत पोहोचला आहे.” त्यांनी कर्मवीर चौक मित्र मंडळाचे संगणक भेट दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार मानले.
या सर्व कार्यक्रमांमध्ये कर्मवीर चौक मित्र मंडळ आणि अलवारीस यूथ फाऊंडेशनच्या सर्व सदस्यांनी व्यवस्थापनात सक्रिय भूमिका बजावली. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळेच हे कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडले आणि समाजात एकात्मतेचा संदेश पोहोचवला गेला.
या कार्यक्रमांमुळे श्रीरामपूरमध्ये सामाजिक ऐक्याचे उदाहरण स्थापित झाले आहे. समाजातील प्रत्येक घटकाने या कार्यक्रमांना दिलेला प्रतिसाद हेच आमच्या उपक्रमांचे यश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ऍड. सादिक शिलेदार, सुनील डहाळे, समीर शेख, तौफिक शेख, अकबर शेख, शाकिब शेख, इम्रान शेख, साहिल कुरेशी, अफान कुरेशी, मतिन कुरेशी, हनिफ सैय्यद, दानिश शेख, अमान शेख, शाहिद पटेल, परवेज देशमुख, सद्दाम शेख, आदिल पठाण, अयाज सैय्यद, अलतमश शेख, कुरबाण शाह, आफताब पठाण, आफताब शेख, साहिल पठाण, इरफान पठाण, परवेज बागवान, शाहरुख शेख, नाझीम शेख, साहिल शेख, अजय कमाने, अल्ताफ शेख, कैफ शाह, शादाब सरदार भाई खान आणि इतर सदस्यांचा विशेष वाटा होता. त्यांच्या अथक मेहनतीमुळेच कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडले.




Post a Comment
0 Comments