Type Here to Get Search Results !

नाशिक पंचवटी मतदार संघात जगदीश गोडसे यांची जोरदार तयारी...

नाशिक पंचवटी मतदार संघात जगदीश गोडसे यांची जोरदार तयारी...

विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली जगदीश गोडसे यांच्या तयारीनी.

नाशिक/प्रतिनिधी 

     महाराष्ट्रात काही दिवसातच लोकसभेच्या मागोमाग विधानसभेची तयारी महाराष्ट्रातले मुख्यमंत्री वरिष्ठ विविध पक्षाचे नेते यांनी मोर्चे बांधणी सुरुवात केली आहे.

        नाशिक जिल्ह्यात पंचवटी मतदार संघात इच्छुक असलेले उमेदवार जगदीश गोडसे यांनी यापूर्वी सामाजिक कामात एक मोठा ठसा उमटवला आहे.तसेच करन्सी व आयएसपी नोट प्रेस चे जनरल सेक्रेटरी म्हणून त्यांच्याकडे भरपूर वर्षापासून जबाबदारी आहे वर्षापासून नोट प्रेस मध्ये आडलेले जे प्रश्न होते नोकर भरती व हॉस्पिटल इत्यादी  प्रश्न त्यांनी मार्गी लावले त्याचप्रमाणे सामाजिक सेवेची आवड असल्यामुळे पंचवटी मतदारसंघातले हॉस्पिटल शाळा कॉलेज व पाणीपुरवठ्याचे तसेच पंचवटीतल्या रस्ता व जेलरोड नाशिक रोड चा रस्ता या विविध प्रश्नांवर आंदोलन करून त्यांनी नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला या कारणामुळे कामगार नेते जगदीश गोडसे यांची लोकांशी नाळ जुळून गेल्यामुळे लोक आग्रहस्त विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचाराची सुरुवात केली पंचवटी मतदार संघात त्यांनी त्यांच्या प्रचाराचे पत्रक व लोक उपयोगास पडण्याची माहिती पत्रक घरोघर जाऊन वाटप करण्यात आली त्यामुळे मतदारसंघातील अनेक उमेदवार यांना त्यांच्याबद्दल त्यांच्या कामाबद्दल धडकी भरली आहे.

        पंचवटी मतदार संघात लोकांकडून जगदीश गोडसे यावेळचे आमदार होणार असे बोलले जाऊ लागलेले आहे पंचवटी मतदार संघात आत्तापर्यंत रिपीट आमदार झालेला नाही सुशिक्षित उमेदवार असल्यामुळे जगदीश गोडसे यांच्याकडे बघण्याचा मतदारसंघात वेगळा कल झालेला आहे कारण इतर उमेदवार त्यांच्याकडे सुशिक्षित नाही लोकांचे म्हणणे आहे की जो आमच्या प्रश्नासाठी भांडेल त्यालाच आम्ही निवडून देऊ यामुळे जगदीश गोडसे यांचा विजयाचा मार्ग मोकळा झालेला आहे.




Post a Comment

0 Comments