विद्यार्थी आशीर्वाद ,पालक मेळावा,वार्षिक स्नेहसंमेलन व प्रवचन खेडे गुरुकुल येथे सोहळा संपन्न...
श्री संत जनार्दन स्वामी विद्यालय गुरुकुल खेडे हिंगलाज नगर...
निष्काम कर्मयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी यांचे उत्तर अधिकारी जगद्गुरु शांतिगिरी महाराज यांनी स्थापन केलेलं नाशिक मधील एकमेव गुरुकुल खेडे येथे वार्षिक इयत्ता दहावीच्या वर्गाचा आशीर्वाद समारंभ, पालक मेळावा व सांस्कृतिक कार्यक्रम सोहळा संपन्न झाला. सर्वप्रथम पालक मेळावा संपन्न होऊन विद्यार्थ्यांच्या प्रगती विषयी विचारणा व चर्चा करण्यात आली तसेच नवीन वर्षाचे प्रवेश लगेच चालू करण्यात आले. यानंतर जगद्गुरु जनार्दन स्वामी यांचे उत्तर अधिकारी श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज यांना प्रयागराज येथे आखाडा परिषदेने जगद्गुरु ही पदवी देऊन सन्मानित केले म्हणून भव्य दिव्य अशी शोभायात्रा व डोलीची मिरवणूक काढण्यात आली. या यात्रेनंतर बाबाजींची विधी विधी आरती करून कार्यक्रमास शुभारंभ झाला विद्यार्थ्यांनी विविध विषयावरती नृत्य, गायन ,भजन सादर केले .महाभारत व बाबाजींचा प्रयागराजयेथील जगद्गुरु पट्टाभिषेक सोहळा या नाटिका चित्तधारक व आकर्षक ठरल्या.
या कार्यक्रमात स्वतः जगद्गुरु शांतिगिरी महाराज यांनी प्रवचनातून विद्यार्थ्यांना शुभाशीर्वाद देत गुरुकुलाच्या प्रगतीचा लेखाजोखा पालकांसमोर मांडला व आपल्या मुलांना बाबाजींच्या गुरुकुलात का पाठवायचे यासाठी मार्गदर्शन केले. प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर विविध समितीवरील अधिकारी व पदाधिकारी यांची उपस्थिती होती. संस्थेचे सदस्य व कार्यकारी मंडळ आश्रम ,शालेय व्यवस्थापन समिती सदस्य उपस्थित होते .
ब्रह्मचारी स्वामी विवेकानंद जी महाराज यांनी सर्वांना उडबोधित केले. शाळेचे मुख्याध्यापक श्री शेळके गुरुजी पर्यवेक्षक श्री साने गुरुजी यांनी उपस्थित आमचे आभार मानले. प्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री शेजुळ गुरुजी यांनी केले व स्वर संयोजन विद्यार्थी बाल स्वरांजली व माजी विद्यार्थी राहुलजी शिंदे यांनी केले. महाप्रसादाचा सुंदर कार्यक्रम सांगतेला पार पडला.
या संपूर्ण कार्यक्रमा च्या यशस्वीतेसाठी ठाणा अधिपती श्री स्वामी कमल गिरीजी महाराजतसेच श्री संत जनार्दन स्वामी विद्यालय गुरुकुल खेडे मुख्याध्यापक, शिक्षक ,शिक्षक इतर कर्मचारी आश्रम व्यवस्थापन ,वस्तीग्रह व्यवस्थापन या सर्वांनी कठोर परिश्रम घेतले.
आपल्या परिसरातील बातम्या व जाहिरातीसाठी
संपर्क:- मुख्यसंपादक :- मयुर फिंपाळे मो.9021816965







Post a Comment
0 Comments