ओझरच्या जगदगुरु जनार्दन स्वामी महाराज आश्रमात सेवेकरी महिलांचा सन्मान !
महिला दिनानिमित्त महावस्त्र देऊन केले पूजन
ओझर /प्रतिनिधी:- अमर आढाव
निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगदगुरु जनार्दन स्वामी (मौनगिरीजी) महाराज यांच्या श्रीक्षेत्र ओझर येथील आश्रमातील देवभूमी जनशांती धाम येथे महिला दीन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.येथील सेवेकरी महिला मातांचे महावस्त्र ,श्रीफळ,पुष्पहार,प्रसाद देऊन विशेष पूजन व सन्मान करण्यात आला.
कठोर तपस्वी निष्काम कर्मयोगी जगदगुरू जनार्दन स्वामी (मौनगिरीजी) महाराज यांच्या स्मरणार्थ उत्तराधिकारी अनंत विभूषित जगदगुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज यांनी ओझर येथे देवभूमी जनशांती धामाचे निर्माण केले.या धामात अनेक महिला व पुरुष साधक सदगुरु सेवेसाठी येत असतात.दरम्यान महिला दिनानिमित्त आश्रमातील सेविका अनिता शिंदे, संगीता रूमने,वडनेरची आई,सुरेखा कांबळे,जयश्री शेवाळे, कमल मुरकुटे,चंद्रभागाबाई कोतवाल,लंकाबाई पवार ,सिंधू खुर्दळ,कमल कुटे, अलका धोंडगे, आदी महिला सेवेकरी यांचा विशेष सन्मान करण्यात आला.त्यांच्या समर्पण व सेवेचा गौरव यावेळी करण्यात आला. महावस्त्र,श्रीफळ व पुष्पहार,प्रसाद देऊन त्यांचा सन्मान विशेष सन्मान करण्यात आला.यावेळी आश्रमीय संत व विश्वस्त देवानंदगिरी महाराज,ऋषिकेशानंद महाराज,दयानंद महाराज (कल्याण) व्यवस्थापक संतोष अनवट, के.टी.(तात्या) काशीद, ज्ञानेश्वर (मामा) भुसे,प्रदीप धोंडगे,अनिल ठाकरे,बाळासाहेब गोडसे, विजय सोनवणे,पीयूष कांबळे,ओमकार पोमनर,बाळासाहेब शिंदे,आकाश दळवी,संकेत भोसले,दीपक पगारे,गणेश फटांगडे,जयेश ढोमसे यांसह सेवक उपस्थित होते. जगदगुरु जनार्दन स्वामी (मौनगिरिजी) महाराज आणि उत्तराधिकारी जगदगुरु स्वामी शांतीगिरीजी महाराज यांनी नेहमीच महिला मातांचा सन्मान केला आहे.त्यांच्यासाठी महिला जपानुष्ठान सारखी दिव्य परंपरा सुरू केली.विविध कार्यक्रमात महिला शक्तींचा गौरव करण्यात आलेला आहे.नारी की निंदा मत करो, नारी है रतन की खान, जिससे पैदा हुए राम,लखन,हनुमान..असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.महिला सेविकांना महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.



Post a Comment
0 Comments