माळवाडगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात...
माळवाडगाव/प्रतिनिधी:- संदीप आसने
विद्यार्थ्यांवर मूळ संस्कार हे प्राथमिक शिक्षकच करतात. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध गुणदर्शन कार्यक्रम उपयुक्त ठरतात. पुस्तकी अभ्यासासोबतच विद्यार्थ्यांनी विविध कला, चांगले छंद जोपासावेत. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नेहमीच करत असते,’’ असे मत प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक (आयपीएस) रॉबिन बन्सल यांनी व्यक्त केले.
माळवाडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बुधवारी वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. श्रीरामपूर पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रशिक्षणार्थी सहाय्यक पोलीस अधीक्षक रॉबिन बन्सल हे होते. यावेळी भारत मातेचे पूजन आयपीएस अधिकारी रॉबिन बन्सल यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाची सुरुवात श्री गणेश वंदन नृत्याने झाली. यावेळी प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. या वेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उद्धव शेळके, उपाध्यक्ष व भाजपचे तालुका प्रसिध्दी प्रमुख संदिप आसने, उपाध्यक्ष ललिता उमाप, सुदाम आसने, सचिन आसने, दीपक आसने, किरण शिंदे, पत्रकार प्रवीण साळवे, सुमन आसने, मनीषा प्रवीण आसने, तेजस्विनी आसने, सुरभी दांगट, आरती आसने आदि उपस्थित होते.
यावेळी मुख्याध्यापक देवदास मुंतोडे यांनी शाळेच्या प्रगतीचा लेखाजोखा मांडला. प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांसाठी पालकांनीही खिसा रिकामा करत हजारो रुपये बक्षीस दिले. यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. या कार्यक्रम प्रसंगी श्रीरामपूर पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी, उत्तमराव आसने, तंटामुक्तीचे उपाध्यक्ष बाळासाहेब आसने, उपसरपंच शाम आसने, ग्रामपंचायत सदस्य सुरेश आसने, योगेश आसने, बबनराव आसने, माजी अध्यक्ष जालिंदर आसने, रावसाहेब काळे नाना, इंग्लिश स्कूल शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष सुनिल आसने, सुभाष आसने, पत्रकार रवींद्र आसने, माळवाडगाव सोसायटीचे सचिव प्रदीप आसने, सुनील आसने, बापूसाहेब आसने, भगवान उर्फ रवींद्र आसने, तान्हाजी खताळ, वैभव आढाव, राहुल कावरे, पद्माकर आसने, हरी त्रिभुवन, मंगेश साळवे, अनिल आसने, सदाशिव आसने, सुधीर आसने, राणी गाडे, छाया दांगट, भक्ती आसने, अर्चना आसने, मंदा आसने, पल्लवी शिंदे, मीना आसने, माया शिंदे, अलका आसने, अश्विनी धायगुडे, आरती दुशिंग, वैशाली साळवे, पुजा आसने, रोहिणी शेळके, अनिता आसने आदी ग्रामस्थ पालक मान्यवर उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक मुंतोडे सर, पाचपिंड सर, धोंगडे सर, शेळके सर, साळवे मॅडम, बोबडे मॅडम, मते मॅडम, तोडमल मॅडम, साळवे मॅडम, कोरिओग्राफर त्रिंबके आदींनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. मारिया साळवे व शेळके सर यांनी प्रास्ताविक केले तर शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष पत्रकार संदीप आसने यांनी उपस्थितांचे आभार मानले.



Post a Comment
0 Comments