कमलपूर बंधारा दुरुस्तीसाठी निधीची तरतूद-पटारे;ना. विखे पाटील यांचे प्रयत्न; सद्गुरु गंगागिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताह नियोजित जागा पाहणी कार्यक्रम दिली माहिती...
श्रीरामपूर (प्रतिनिधी)
गोदावरी नदीवरील कमलपूर बंधाऱ्याच्या दुरुस्तीला येत्या 10 ते 12 दिवसांत सुरुवात होईल.या कामासाठी जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी निधी उपलब्ध करून दिला असून त्यामुळे शनिदेवगाव (ता. वैजापूर) येथे होणाऱ्या सद्गुरु गंगागिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहावेळी येणाऱ्या भाविकांची गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे, अशी माहिती श्रीरामपूर भाजपचे नेते सभापती दीपक पटारे यांनी दिली आहे.
सद्गुरु गंगागिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताह नियोजित जागा पाहणी कार्यक्रम प्रसंगी कमालपूर - शनी देवगाव येथील शनी महाराज मंदिर येथे आयोजित कार्यक्रमात पटारे बोलत होते.याप्रसंगी श्रीरामपूर भाजप तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे पा., गिरिधर आसने यांच्यासह सप्ताह कमिटीचे प्रमुख पदाधिकारी विजय पवार व त्यांचे सहकारी उपस्थित होते.
ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी सप्ताहाच्या कार्यात संबंधित गावांच्या प्रश्नांबाबत कुठल्याही प्रकारची अडचण येऊ दिली जाणार नाही,असे यापूर्वीच स्पष्ट केले असल्याची आठवण यावेळी बोलताना दिपक पटारे यांनी करून दिली. ते पुढे म्हणाले की,ना. राधाकृष्ण विखे पाटील यांची सरला बेटावर नितांत श्रद्धा आहे. त्यामुळे हा सप्ताह वैजापूर तालुक्यासह श्रीरामपूरसाठी सुद्धा तितकाच महत्वाचा असून त्या दृष्टीने शनी देवगाव येथील सप्ताह स्थळाकडे येणाऱ्या छोट्या मोठ्या रस्त्यांची दुरुस्तीही येत्या काळात ना. विखे पाटील यांच्या निधीतून केली जाणार आहे.याबाबत कमलपूर येथील भाजप कार्यकर्ते आणि सप्ताह कमिटीने ना. विखे पाटील यांची यापूर्वीच भेट घेऊन त्यांना रस्त्यांच्या व बंधाऱ्याच्या दुरवस्था बाबत अवगत केले होते.सप्ताहासाठी जागेची कुठलिही अडचण वाटत नाही.अतिशय भव्य दिव्य जागा असून मठाधिपती रामगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली कुठल्याही राजकिय गटातटाचा विचार न करता हे धर्मिक कार्य आपण सर्वजण मिळून करू.येत्या आठ दहा दिवसांत ना.विखे पाटील यांची वेळ घेवून सप्ताह कमिटी व सर्वांच्या उपस्थितीत येथे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी आपण प्रयत्न करू असेही पटारे शेवटी म्हणाले.यावेळी शनी महाराज ट्रस्टच्या वतीने पटारे यांचा सन्मान करण्यात आला.याप्रसंगी शनी महाराज ट्रस्टचे पदाधिकारी,ना.राधाकृष्ण विखे पाटील विचार मंच,कमालपूरचे कार्यकर्ते आदींसह मोठ्या संख्येने शनी भक्त उपस्थित होते.



Post a Comment
0 Comments