ओझर : प्रतिनिधी:- अमर आढाव
कठोर तपस्वी निष्काम कर्मयोगी जगदगुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या मातोश्री म्हाळसा माता तसेच उत्तराधिकारी अनंत विभूषित जगदगुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या मातोश्री फुलामाता यांच्या पुण्यतिथी निमित्त महिला सक्षमीकरणासाठी ओझर येथे उद्या गुरुवार पासून महिला जपानुष्ठान सोहळ्याचा प्रारंभ होत आहे.७७७ किलो चांदीचा रथ, भगवान बाणेश्वर महादेवाचा चांदीचा मुकुट, जगदगुरु जनार्दन स्वामी महाराज यांची पवित्र पालखी मिरवणुकीत असणार आहे
ओझर येथील जगदगुरु जनार्दन स्वामी (मौनगिरीजी) महाराज आश्रमातील देवभूमी जनशांती धाम येथे अनंत विभूषित जगदगुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या गुरुवार दिनांक ११ सप्टेंबर पासून मातोश्री म्हाळसा माता व मातोश्री फुलामाता यांच्या पुण्यतिथी सोहळ्याचा प्रारंभ होत आहे. महिला सक्षमीकरणासाठी आठवडाभर भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून सोहळ्या दरम्यान खास महिला साधिकांसाठी जपानुष्ठान, अखंड नंदादीप, महायज्ञ, अभिषेक पूजन, हस्तलिखित नामजप, श्रमदान, रोज पहाटे ब्रह्ममुहूर्तावर नित्यनियम विधी, दिवसातून चार वेळा विधी-पाठांतर, भागवत वाचन, सत्संग, महाआरती आदी विविध आध्यात्मिक व सामाजिक उपक्रम संपन्न होणार आहे. महिला सक्षमीकरणाचा संदेश देत, संपूर्ण आठवडाभर महिलांसाठी विविध उपक्रम राबविले जाणार आहे. महिला जपानुष्ठान सोहळ्याच्या प्रारंभी गुरुवारी ११ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता ओझर परिसरातून ७७७ किलो चांदीचा रथ,भगवान बाणेश्वर महादेवाचा चांदीचा मुकुट व जगदगुरु जनार्दन स्वामी महाराज यांच्या पवित्र पालखीची लक्षवेधी मिरवणूक संपन्न होणार आहे.या मिरवणुकीत हजारो महिला साधिका सहभागी होणार आहे.अधिकाधिक महिला मातांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.



Post a Comment
0 Comments