ओझर : प्रतिनिधी
ओझर येथील विश्वेश शिवानंद आढाव याने एव्हरेस्ट अबॅकस अकॅडमी आयोजित राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. देशभरातून शेकडो विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. प्रचंड स्पर्धात्मक वातावरणात विश्वेशने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्याच्या यशाची सर्वत्र प्रशंसा होत आहे.
अबॅकसच्या माध्यमातून वेग,अचूकता व मानसिक गणित कौशल्य दाखवत विश्वेशने परीक्षकांना प्रभावित केले. स्पर्धेत अवघड गणिती उदाहरणे सोडवताना त्याने दाखवलेली तयारी व आत्मविश्वास वाखाणण्याजोगा होता.
या यशामुळे ओझर व परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून शिक्षक, पालक व मित्रपरिवाराकडून त्याचे अभिनंदन होत आहे. योग्य मार्गदर्शन, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर मिळवलेले हे यश सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.



Post a Comment
0 Comments