Type Here to Get Search Results !

विद्युत मंडळाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर चेंडूफळ येथे शॉर्टसर्किटमुळे शेतकऱ्यांचे लाखोचे नुकसान...

 वैजापूर/प्रतिनिधी:- रवींद्र पवार 

        वैजापूर तालुक्यातील चेंडूफळ या ठिकाणी भारत भागवत पवार, अभय लक्ष्मीकांत पवार,राजेंद्र विजय पवार, गट नंबर 45 गट नंबर 46 यांच्या शेतात महावितरणचे पोल असून त्या तारांच्या शॉर्टसर्किटमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले असून ते नुकसान भरून निघण्यासारखे नाही वेळोवेळी या गावातील शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालय वैजापूर यांच्याकडे तक्रार देखील केलेले होत्या मात्र महावितरणचे अधिकारी कर्मचारी शेतकऱ्यांना कस पटा प्रमाणे समजतात महाराष्ट्र राज्यात शेतकऱ्यांना आत्महत्या का कराव्या लागतात त्याचे मुख्य कारण हेच आहे.

 [ ऊर्जा मंत्री साहेब हाच का आपला महाराष्ट्र हीच का मोगलाई असाही प्रश्न यावेळी उपस्थित होतो ]

 आधीच अतिवृष्टी त्यात ही आर्थिक हानी कसे करणार शेतकरी मुला बाळांचे शिक्षण दवाखाना कसं चालणार पोटपाणी साहेब आमच्या चॅनलने आत्तापर्यंत दहा वेळेस पाठपुरावा केलेले आहेत.

 मात्र तरीही सरकार उदासीन आहे तुमचा न्याय असाच म्हणायचा का ? 

       सरकार कोणाचेही असो मायबाप शेतकरीच होरपळणार विझल्या तरी चुली शेतकऱ्यांच्याच विजतील जगाचा पोशिंदा मेला काय आणि जाळात होरपळत राहिला काय या जाड कातड्याच्या अधिकाऱ्यांना काही फरक पडत नाही. 

     साहेब शेतकऱ्यांचा तळतळाट आणि अर्थाहक सांगते जो शेतकरी तुम्हाला न्यायदानाच्या खुर्चीवर बसू शकतो तो एक दिवस तुम्हाला उतरूही शकतो वैजापूर तालुक्यापासून 45 किलोमीटर अंतर असल्यामुळे अग्निशमक वाहन येऊ शकत नाही काय शोकांतिका आहे. शेतकऱ्यांच्या जीवनात याच त्रासाला कंटाळून नदीकाठच्या गावांनी कलेक्टर ऑफिसला संभाजीनगर येथे  उपोषण केले होते की आम्हाला शेजारच्या अहिल्यानगर जिल्ह्याला जोडून द्या कारण की संभाजीनगर जिल्ह्यातून या गोष्टीची पूर्तता होत नाही टेलची गावे कायम उपेक्षितच असतात.

      राज्याचे ऊर्जामंत्री साहेब छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री साहेब वैजापूरचे आमदार साहेब या शेतकऱ्यांना आपण काय न्याय मिळवून देता याकडे मात्र संपूर्ण राज्याचे लक्ष राहील इतकीच तुम्हाला विनवणी शेतकरी वर्गाकडून.





Post a Comment

0 Comments