Type Here to Get Search Results !

श्रीरामपूर शहर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी — गुंगीकारक नायट्राझेपम गोळ्यांच्या विक्रीप्रकरणी तस्लीम ऊर्फ काल्या शेख अटक; २४ हजारांचा मुद्देमाल जप्त 🚔


श्रीरामपूर/ प्रतिनिधी:- रविंद्र आसने

         श्रीरामपूर :- शहरातील बसस्थानक परिसरात गुंगीकारक नशेच्या नायट्राझेपम गोळ्यांची विक्री करण्यासाठी आलेल्या भुसावळ येथील सराईत आरोपी तस्लीम ऊर्फ काल्या सलीम शेख (वय 30) याला श्रीरामपूर शहर पोलिसांनी सापळा रचून रंगेहात पकडले. त्याच्याकडून एकूण ₹24,026/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.ही कारवाई दिनांक 17 ऑक्टोबर 2025 रोजी सायं. 6.50 वाजता करण्यात आली. पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे बसस्थानक परिसरात तपास पथकाने कारवाई केली. औषध निरीक्षक सोमनाथ मुळे (अहिल्यानगर) यांच्या समन्वयाने तपास पथकाने बसस्थानक परिसरात संशयास्पद हालचाल करणाऱ्या इसमावर लक्ष ठेवले.सुमारे 7.30 वाजता, बसस्थानकाच्या भिंतीजवळ, शौचालयासमोर फुल्याफुल्याचा शर्ट घातलेला इसम हातात पिशवी घेऊन उभा असल्याचे दिसले. चौकशीअंती त्याने आपले नाव तस्लीम ऊर्फ काल्या सलीम शेख असे सांगितले. त्याच्याकडे परवाना किंवा वैद्यकीय चिठ्ठी नसताना गुंगीकारक नशेच्या गोळ्या विक्रीसाठी आणल्याचे त्याने कबूल केले.त्याच्याकडून मिळालेला मुद्देमाल पुढीलप्रमाणे नायट्राझेपम (Nitrazepam Tablets IP) या औषधाच्या एकूण 19 पाकिटांमध्ये प्रत्येकी 10 गोळ्या - अंदाजे किंमत ₹1,026/-रोख रक्कम ₹23,000/- 👉 एकूण मुद्देमाल: ₹24,026/-या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गु. र. नं. 928/2025 नोंदवून आरोपीला अटक करण्यात आली आहे.       

      ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या नेतृत्वात करण्यात आली.कारवाईत पो.उ.नि. समाधान सोळंके, पो.उ.नि. रोशन निकम, पोहेकॉ प्रसाद साळवे, पोना संदीप दरदंले, पोकॉ अजित पटारे, मच्छिंद्र कातखडे, संभाजी खरात, सचिन दुकळे, आजिनाथ आंधळे, ज्ञानेश्वर वाघमोडे यांनी सक्रिय सहभाग घेतला.अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र शिखरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.



Post a Comment

0 Comments